Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराड प्रकरणी SIT ला मोठं यश, आतापर्यंतची मोठी अपडेट

Walmik Karad : बीड कोर्टात SIT ने संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडबदद्ल अनेक मोठे खुलासे केल्यानंतर कराड यांना मोठा झटका लागलाय. बीड कोर्टाने कराडला 7 दिवसांची SIT कोठडी दिलीय. 

नेहा चौधरी | Updated: Jan 15, 2025, 06:45 PM IST
Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराड प्रकरणी SIT ला मोठं यश, आतापर्यंतची मोठी अपडेट title=

Walmik Karad Custody : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडबद्दल (Walmik Karad)  बीड कोर्टात आज एसआयटीने अनेक मोठे खुलासे केले आहेत. वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आज बीड कोर्टात झालेल्या सुनावणीत SIT ला मोठं यश मिळालंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला बीड कोर्टाने कराडला 7 दिवसांसाठी SIT कोठडीत पाठवलंय. 

दरम्यान या प्रकरणी आज एसआयटीने बीड कोर्टात वाल्मिक कराडबद्दल मोठे खुलासे केलेत. ज्यात 9 डिसेंबर रोजी जेव्हा संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये फोनवरून संभाषण झाले. या दरम्यान तिघांमध्ये त्या दिवशी नेमकं काय बोलणं झाला याचा तपास एसआयटीला करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या दहा दिवसाच्या कस्टडीची मागणी SIT तर्फे करण्यात आली होती. या मागणीला आता बीड कोर्ट मान्यता देते 7 दिवसांसाठी SIT कोठडीत पाठवलं आहे. 

 

हेसुद्धा वाचा - Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेला मदत? हत्येच्या दिवशी धमकी, अपहरण अन् आरोपींसह फोनवर संवाद...; वाल्मिकचा पाय खोलात

 

दरम्यान वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावाही एसआयटीकडून आज बीड कोर्टात करण्यात आला. 

हेसुद्धा वाचा - Santosh Deshmukh Murder : हत्येच्या कटात वाल्मिकचा सहभाग? 'त्या' तिघांनी फोनवर...; SIT चा धक्कादायक खुलासा

 

पिंपरी चिंचवड महापालिकेचा वाल्मिक कराडला दणका 

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या गडगंज संपत्ती बाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात देखील वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या आयव्हरी इमारतच्या 6व्या मजल्यावर 601 नंबर चा 3.15 कोटीपेक्षा अधिक किमतीचा 4 बीएचके फ्लॅट असल्याचे समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे कराडने या त्याचा फ्लॅटचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मिळकत कर न भरल्यामुळे कर संकलन विभागाने त्याच्या या फ्लॅट वर नोटीस सुद्धा लावली आहे. वाकडमधील कराडचा फ्लॅट महापालिका जप्त करणार आहे, अशी माहिती समोर आलीय. वाल्मिक कराडकडे 1 लाख 55 हजारांचा मालमत्ता कर थकित असून  पिंपरी चिंचवड महापालिकेने नोटीस बजावली असल्याची माहिती मिळाली आहे.