ठाकरे-शिंदेंमुळे आमदाराच्या घरात उभी फूट; बहिणाचा भावाविरोधातच एल्गार

सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षाने एका कुटुंबात उभी फूट पडलीय

Updated: Oct 11, 2022, 11:18 AM IST
ठाकरे-शिंदेंमुळे आमदाराच्या घरात उभी फूट; बहिणाचा भावाविरोधातच एल्गार title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission) एक मोठा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्ष नाव आणि चिन्ह गोठवत ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाला (CM Eknath Shinde) मोठा धक्का दिला होता. यानंतर नव्या चिन्ह आणि नावांसह दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे (election commission) धाव घेतली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे गटासाठी (CM Eknath Shinde) नव्या नावांचं वाटप केलं आहे. उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' हे नाव मिळालं असून, 'मशाल' हे चिन्ह देण्यात आलं. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावासाठी मान्यता देण्यात आली आहे. यानंतर आता शिंदे गटाने पुन्हा पिंपळाचे झाड, सूर्य आणि ढाल तलवार या चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे.  (shinde group mla kishor patil Sister vaishali suryavanshi against brother)

हे ही वाचा : "कदाचित नवीन चिन्ह..."; धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

यानंतर दोन्ही गटांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र आता शिवसेनेत (shivsena) फूट पडल्यानंतर एका कुटुंबांच्या नात्यातही फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (kishor patil) यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी (vaishali suryavanshi) यांनी बंडखोर भावासह शिंदे गट (Shinde Group) व भाजपा (BJP) विरुद्ध एल्गार पुकारला आहे. सत्तेसाठी शिवसेना संपवणाऱ्या गद्दारांचा धिक्कार आहे, असे वैशाली सूर्यवंशी (vaishali suryavanshi) यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे चिन्ह गोठण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाचा हा निर्णय संविधानाविरुद्ध असल्याचा आरोप करत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसैनिकांनी निषेध मोर्चा काढत बंडखोरांविरोधात व भाजपा विरोधात घोषणाबाजी केली. बाळासाहेबांनी कष्टाने घाम गाळून शिवसेना उभी केली. "धनुष्यबाणाला बाळासाहेब देव्हाऱ्यात ठेवून पूजा करायचे त्या बाळासाहेबांची शिवसेना गोठून टाकण्याचा निर्णयाला जनता माफ करणार नाही," असे वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या.

हे ही वाचा : "शिवसेनेचे दोन तुकडे होण्यामागे उद्धव ठाकरे यांच्याही चुका"; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची टीका

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी व ठाकरे गटाच्या शिवसेना महिला पदाधिकारी वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात हा निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा निमित्त शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या बंडखोर भावासह शिंदे गट व भाजपा विरुद्ध एल्गार पुकारला असल्याचे बोलले जात आहे.