पुणतांबा, अहमदरनगर : किसान क्रांतीच्या सदस्यांनी शेतकरी संपाबाबात घेतलेली भूमिका पुणताबांसह राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांना मान्य नाही.
राज्यातील शेतकऱ्यांच्या सरकट कर्जमाफीवर शेतकरी अदयापही ठाम आहेत. कोअर कमेटीच्या सदस्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर पुणतांब्यात ग्रामसभा घेत निर्णय जाहीर करण्याच सांगणाऱ्यांनी मुंबईत कसा निर्णय घेतला? असा सवाल करत शेतक-यांनी कोअर कमेटीच्या विरोधात पुणतांब्यात घोषणाबाजी केली आहे.
रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेनेही कोअर कमेटीचा निर्णय मान्य नसल्याचा सांगत आंदोलन काम ठेवणार असल्याचा सांगितलंय. त्यासाठी आज दुपारी श्रीरामपुरात शेतकरी संघटनेची एक बैठक घेणार आहेत.