यवतमाळ : यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील महागांव कसबा गावात एका घरावर चढलेला वळू खाली उतरायचे नाव घेत नसल्याने त्याला उतरविण्यासाठी ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गणेश राठोड यांच्या घराच्या छतावर शनिवारी रात्री पायऱ्या चढून वळू गेला. आणि ठिय्या मांडून बसला. सकाळी छतावर वळू दिसल्याने ग्रामस्थांनी गर्दी केली.
अरुंद पायऱ्या चढून हा वळू छतावर गेला कसा असा प्रश्न अनेकांना पडला शिवाय आता वळू ला खाली उतरवावे तरी कसे असाही प्रश्न होताच. घाबरत घाबरत अनेकांनी वळू जवळ जाऊन त्याला चारा दाखवून खाली उतरविण्याचे प्रयत्न केले मात्र वळू काही खाली उतरेना झालाय. तो छतावर ठिय्या मांडून बसल्याने घरमालक चिंतीत असून त्याला सुखरूप खाली उतरविण्यासाठी ग्रामस्थ वेगवेगळे उपाय शोधत आहेत.