मुंबई : लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन अभिनेता आमिर खान याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपण पाच महिन्यात कसे वजन कमी केले हा अनुभव यावेळी सांगितला. मुलांमधील वाढता लठ्ठपणा कमी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग मदत करणार असून, शस्त्रक्रियेसाठीही मदत मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कार्यक्रमासाठी अभिनेता आमिर खान मंत्रालयात पोहोचला त्यावेळी त्याला पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी होती.
- एकाबाजूला कुपोषण आहे आणि दुसऱ्या बाजूला लठ्ठपणा
- मला आनंद आहे, या विषयावर आपण काम करतोय.
- जोपर्यंत लठ्ठपणाचे गंभीर परिणाम दिसत नाहीत तोपर्यंत आपण गांभीर्याने घेत नाही.
- पोषक खाद्यपदार्थाचे महत्व आपल्याला कळत नाही, लहान मुलांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे
- आमिर खान याच्या हस्ते उद्घाटन लहान मुलांच्या लठ्ठपणावरील उपायासाठी वेबसाईटचे उद्घाटन
तुमचे जेवण योग्य हवे. जे जुने आहे. त्याची मी अंमलबजावणी करतो. किती कॅलरीज हव्यात त्यानुसार माझा आहार असतो. कोण केवळ भात खातो, तर काही जण कमी भात खातात. काही जण कमी आहार घेतात. हे चुकीचे आहे. मी जुन्या पद्धतीचाच अवलंब करतो. जेवढी ऊर्जा खर्च करतात त्याप्रमाणे आहार हवा. तुम्ही 2000 हजार कॅलरी खर्च करत असाल तेवढ्याच प्रमाणात आहार हवा. एकाच पद्धतीचा आहार नको. तरच तुमचे वजन बॅलन्स राहते.
सोडीअम, प्रोटीन, कोर्बोहायड्रेट, फायबर हे सर्व घटक हवे. 50 टक्के कोर्बोहायड्रेट आहारात हवा. त्याने शरीराला फायदा होता. त्यामुळे तुमचे वजन योग्य राहते. जर तुम्हाला वजन वाढवाचे असेल तर तुम्ही ते उलट्या क्रमाने करा. 2000 कॅलरीज खर्च करत असाल तर तुम्ही 3000 कॅलरीज घ्या. तसेच त्याउलट वजन कमी करायचे असेल तर उलटाक्रम अवलंबा.