मुंबई : राज्य सरकारने अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची घोषणेची अंमलबजावणी केली. सह्याद्री अतिधथीगृहात झालेल्या कर्जमाफीच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले. यावेळी कर्जमाफी मिळाल्या कुटुंबांनी सर्वांचे आभार मानले.
आज दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकरी कर्जमाफीच्या घोषणाची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका कार्यक्रमात लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यावेळी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्याचा फायदा झालेल्या शेतक-यांपैकी काही शेतकरी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना कर्जामाफीची प्रमाणपत्र देण्यात आली.
दरम्यान, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी दलित आणि आदिवासी योजनांसाठीच्या निधीवर डल्ला मारला जात असल्याचा गंभीर आरोप, पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी केला होता. मात्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा आरोप सपशेल खोटा असल्याचं म्हंटले आहे.