मुंबई : Central Investigation Agency raids in Mumbai : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर केंद्रीय तापस यंत्रणेने छापा मारला आहे. या छाप्यात हाती काय लागणार याची उत्सुकता आहे.
यशवंत जाधव यांची चौकशी केंद्रीय तापस यंत्रणांकडून सुरु आहे. आज पहाटेपासूनच चौकशीला सुरुवात झाली आहे. जाधवांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणा छडती घेत आहे. त्याचवेळी सीआरपीएफचे जवानही घराबाहेर तैनात करण्यात आले आहेत. शिवसेनेचे नेते जाधव हे ईडीच्या रडारवर आहेत.
#UPDATE | Mumbai: Income Tax department searches premises of Shiv Sena corporator and Standing Committee chairperson of BMC, Yashwant Jadhav. pic.twitter.com/cWgAoatNTy
— ANI (@ANI) February 25, 2022
केंद्र सरकार भाजप नसलेल्या राज्यात काम करु देत नाही. केंद्रीय तपास यंत्रणांकडून गैरवापर करण्यात येत आहे. त्यांचा वापर करुन कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा आणखी एका शिवसेना नेत्याची चौकशी सुरु झाली आहे.
ईडीने मंत्री नवाब मलिक यांना अटक केली असल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. असे असताना प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पोहोचले आहेत, असे वृत्तसंस्था ANIने दिले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून छापा मारण्यात आला आहे. यशवंत जावध यांची चौकशी सुरु आहे.