सुस्मिता भदाणे, झी २४ तास, मुंबई: यंदाच्या पावसात सुक्या मच्छीचे भाव गगनाला भिडले आहेत. ज्याचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसणार आहे. सागरी मच्छिमारी कमी झाल्यामुळे माशांची आवक घटली आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात सुकवलेल्या मासळीचे दर दुप्पट झाल्याचे पाहायला मिळते. पावसाळ्यामुळे १ जूनपासून मासेमारी बंदी लागू झाली होती. ही बंदी पुढील ६१ दिवस म्हणजे ३१ जुलैपर्यंत लागू असेल.
सुक्या मासळीचे दर खालीलप्रमाणे
मासे प्रकार - आत्ताचे दर
बोंबील -३०० रूपये -२००रूपये- (१०० रूपये वाढले )
जवळा सुकट - ३००रूपये (५०रूपये वाढले)
कर्दी झिंगा - ५००रूपये (२५० रूपये वाढले)
दांडी - ४००-५००रूपये किलो (२०० रूपये प्रतिकिलो वाढले)
सोडे - १५०० रूपये - १४०० रूपये (१०० रूपये वाढले)
मोतका - ३०० रूपये किलो
मारली -२०० रूपये किलो
मांदेली -२०० रूपये (३० रूपये वाढले)
भांगडा - १५० रूपये डझन (२० रूपये वाढले)
सुरमई -४०० रूपये किलो (५० रुपये कमी झाले)