मुंबई : सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामांन्यांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागतोय. मात्र आता सर्वसामांन्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या (Cng Png Rate Reduce) दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगर गॅस लिमिटेड कंपनीने (Mahanagar Gas Limited) हा निर्णय घेत महागाईने पिचलेल्यांना एका प्रकारे गुड न्यूज दिली आहे. (mahanagar gas limited reduce cng by 6 and png 4 rupees new rates implimeted by 17 august 2022 midnight know new rates)
महानगर गॅसने दिलेल्या माहितीनुसार, सीएनजी प्रति किलो 6 आणि पीएनजीच्या दरात 4 रुपयांनी घट केली आहे. हे सुधारित दर उद्या 17 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. हा निर्णय मुंबई आणि आसपासच्या परिसरात लागू असणार आहे.
महानगरने सीएनजी आणि पीएनजच्या दरात घट केली आहे. त्यामुळे 17 ऑगस्टपासून CNG 80 रुपये किलो आणि मुंबईत पीएनजीची किंमत ही 48 रुपये 50 पैसे असे नवे दर असणार आहेत.