मुंबई : बेस्ट उपक्रमाने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय. बेस्ट उपक्रमाने ज्येष्ठ नागरिकांना बेस्ट प्रवसासाठी तिकिटांमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना बेस्ट प्रवास सवलतीच्या दरात करण्याचा पर्याय खुला झालाय.
मुंबई पालिका क्षेत्रात राहणाऱ्या ६० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या सुविधेसाठी ज्येष्ठ नागरिकांना एक अर्ज भरणं आवश्यक आहे. त्यानंतर उपक्रमाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आरएफआयडी स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.
बेस्ट उपक्रम तोट्यात असताना वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक तरतुदींवर गंडांतर येत असताना ज्येष्ठ नागरिकांना तिकिटांमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांनी तरतूद करण्यात आलीय. बेस्टच्या एसी बसेसव्यतिरिक्त सर्व बसेसमध्ये त्याचा लाभ घेता येणार आहे.