Mumbai Corona News : कोरोनाच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी नवी नियमावली; लक्षपूर्वक वाचा

Mumbai Corona News : चीनमध्ये कोरोना धुमाकूळ घालत असतानाच आता भारतामध्येही सतर्कतेची पावलं उचलली जात आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिकाही (BMC) सज्ज झाली आहे

Updated: Dec 24, 2022, 08:20 AM IST
Mumbai Corona News : कोरोनाच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी नवी नियमावली; लक्षपूर्वक वाचा  title=
Mumbai Corona cases hike advisory issued from BMC latest Marathi news

Mumbai Corona News : चीनमध्ये कोरोना धुमाकूळ घालत असतानाच आता भारतामध्येही सतर्कतेची पावलं उचलली जात आहेत. इथे देशात चीनइतकी वाईट परिस्थिती उदभवली नसली तरीही, येत्या काळात ती वेळही येऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना कोरोनाच्या धर्तीवर सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. 

मुंबई महापालिका सज्ज 

कोरोनाच्या रुग्णांचा (Corona Patient cases) वाढता आकडा पाहता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिकाही (BMC) सज्ज झाली आहे. कोरोनाच्या धर्तीवर मुंबईतील रुग्णालयांमध्ये संसर्गजन्य रुग्णांसाठी 2 हजार 804 खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसंच कोरोनाविषयक नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात येणार आहे. वॉर्डनिहाय वॉर रुमही सज्ज करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकर कोणत्याही अडचणीच्या वेळी वॉर रुम किंवा नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधू शकतात. कोरोना रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनपुरवठाही  ठेवण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : Coronavirus outbreak : कोरोनाचा उद्रेक; चीनमध्ये भयावह परिस्थिती, औषधांसह डॉक्टर्सचाही तुटवडा

 

सध्या कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत असून मुंबई विमानतळावरही विदेशी प्रवाशांच्या चाचण्याही करण्यात येत आहेत. कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं काय गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. 

नागरिकांनी या परिस्थितीत नेमकं काय करणं अपेक्षित आहे? (Corona Safty Measures)

- सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा
- इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवून वावरा. 
- साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा
- आजारी असताना घरी अलगीकरणात राहण्यास प्राधान्य द्या. सर्दी, खोकला असल्यास गर्दीमध्ये जाणं टाळा. 
- स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्या. 

चीनमधील परिस्थिती भयावह (China Corona)

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे दर दिवशीहजारो रुग्णांना त्याची लागण होताना दिसत आहे. संसर्गाची ही स्थिती सध्या पूर्णपणे हाताबाहेर गेली असल्यामुळे आरोग्य यंत्रणाही कोलमडून गेली आहे. चीनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. तर, आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर्स आणि नर्स यांचाही तुटवडा जाणवू लागला आहे. 

परिस्थिती इतकी गंभीर आहे, की इथे औषधांच्या कमतरतेमुळे तापाच्या गोळ्यांसाठी आयकार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्यामुळं आठवड्याला फक्त 6 गोळ्याच खरेदी करता येणार आहेत. सरकारनं इथे औषध कंपन्याही ताब्यात घेतल्या असून टेस्ट किटचं उत्पादन वाढवण्याचे आदेश  दिले आहे.