Mumbai News : ऐन नाताळच्या दिवशी मुंबईकरांपुढे संकट; पाहा मोठी बातमी

Mumbai News : ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी तुम्हीही घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल तर, वेळेचं नियोजन करुनच निघा. असा इशारा का दिला जातोय ते एकदा पाहाच. 

Updated: Dec 24, 2022, 07:35 AM IST
Mumbai News : ऐन नाताळच्या दिवशी मुंबईकरांपुढे संकट; पाहा मोठी बातमी  title=
Mega block on the day of Christmas at Mumbai local western and central line latest Marathi news

Mumbai News : (Christmas 2022) ख्रिसमस तोंडावर असतानाच अनेकांनी आपल्या माणसांना भेटण्यासाठीचे बेत आखले आहेत. त्यातही रविवार (Sunday) हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे हे बेत आणखी धमाकेदार कसे करावेत याचाच विचार अनेकजण करु लागले आहेत. पण, यावर विरजण पडू शकतं. कारण, ऐन नाताळच्या दिवशी मुंबईकरांपुढे संकट असेल ते म्हणजे मेगा ब्लॉकचं. (Mega block on the day of Christmas at Mumbai local western and central line latest Marathi news )

रविवारी मेगाब्लॉक 

रेल्वेच्या यांत्रिकी कामांसाठी  रविवारी मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहारदरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत आणि उपनगरीय मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंक मेगाब्लॉक असेल. ज्यामुळं मुंबईकरांच्या प्रवासात अडथळा येऊ शकतो.  पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री Block घेण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल-माहीमदरम्यान दोन्ही जलद मार्गावर हा ब्लॉक असेल. रविवारी या मार्गावर मेगाब्लॉक होणार नाही. असं असलं तरीही लोकल रेल्वे वेळापत्रकानुसारच धावतील. 

हेसुद्धा वाचा : AC Local ने इतक्या लोकांनी केला फुकट प्रवास... आकाडा पाहून चक्रावाल

 

मेगाब्लॉकमुळे (Mega Block) सीएसएमटी आणि घाटकोपरदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. या दोन स्थानकांदरम्यान भायखळा, परेल, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला स्थानकांवर लोकल थांबतील. 

(Corona) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी गर्दी टाळा 

दरम्यान, रेल्वेचा मेगा ब्लॉक पाहता तुम्ही जर ही गर्दी टाळण्याचा विचार करत असाल तर तो तुमच्यासाठीच फायद्याचा ठरू शकतो. कारण, चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या (Corona Virus) लाटेचे पडसाद मभारतात आणि इथं मुंबईतही पडताना दिसत आहेत. प्रशासनानं दिलेल्या इशाऱ्यानुसार गर्दीच्या ठिकाणी असताना मास्कचा वापर करणं, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं आणि तत्सम सर्व गोष्टींची काळजी घेण्याचं आवाहन मुंबईकरांना आणि इतरही सर्वांनाच करण्यात येत आहे. 

त्यामुळं सुट्टीच्या दिवशी तुम्हीही एखाद्या गर्दीच्या ठिकाणी प्रवास करणार असाल, रेल्वेनं ये-जा करणार असाल तर मास्कचा वापर नक्की करा. अन्यथा मुंबईत पुन्हा लोकल बंद होण्याची वेळ येईल असा दिवस दूर नसेल.