Poonam Pandey Alive : मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनम पांडेला पडलं महागात, मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

Poonam Pandey Alive : शुक्रवार बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. कारण सकाळी सकाळी पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सगळे हादरले होते. पण ती जिवंत असल्याच खुद्द तिने व्हिडीओ शेअर करत सांगितलं. मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनमला महागात पडलं आहे. 

नेहा चौधरी | Updated: Feb 4, 2024, 09:41 AM IST
 Poonam Pandey Alive : मृत्यूची खोटी बातमी पसरवणे पूनम पांडेला पडलं महागात, मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल title=
Poonam Pandey Alive Spreading fake news of death cost Poonam Pandey fir Mumbai police took action

Poonam Pandey Alive : शुक्रवारची सकाळ ही बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी वाईट ठरली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली ज्यामध्ये अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचं निधन झाल्याची ती बातमी होती. गुरुवारी रात्री गर्भाशयातील कॅन्सरमुळे पूनम पांडेचा मृत्यू झाला अशी ती पोस्ट होती. त्यानंतर एकच खळबळ माजली. या बातमी नंतर अनेकांना विश्वास बसला नाही दोन दिवसांपूर्वी पार्टी दिसलेली पूनम एकाऐकी गेली कशी? तर काही लोकांनी ही फेक न्यूज असल्याच म्हटलं. पण पूनम पांडेच्या मॅनजरने या बातमीची पुष्टी केल्यावर अनेकांना वाटलं हे खरंच आहे. पण पूनम पांडे नेमकी कुठे आहे तिचं अंत्यसंस्कार कुठे होणार याबद्दल काही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पूनमच्या निधनाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. (Poonam Pandey Alive Spreading fake news of death cost Poonam Pandey fir Mumbai police took action)

मी जिंवत आहे !

परत एकदा खुद्द सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करुन पूनम पांडे हिने आपण जिवंत असल्याच सांगितलं. गर्भाशयातील कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी अशाप्रकारचं नाटक केल्याच पूनम म्हणाली. त्यानंतर सोशल मीडियासह बॉलिवूडमध्ये तिच्याबद्दल नाराजी पसरली. आयुष्य खूप मौल्यवान असून असं मृत्यूचं नाटक करणं ही एक लज्जास्पद कृत्य असल्याची टीका तिच्यावर झाली. पूनमने आपल्या मरणाचं नाटक करुन स्टंट केल्यामुळे तिच्यावर कारवाईची मागणी जोर धरु लागली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

मुंबई पोलिसांची कारवाई 

अभिनेत्री पूनम पांडेविरोधात वकील अली काशिफ खान देशमुख यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एवढंच नाही तर अभिनेत्रीची मॅनेजर निकिता शर्मा आणि एजन्सी हॉटरफ्लाय यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 417, 420, 120 बी, 34 अंतर्गत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

गर्भाशयाच्या कर्करोगाच्या नावाखाली जनतेची फसवणूक आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप पूनम करण्यात येतो आहे.

पूनमचा हा स्टंट प्रसिद्धी आणि फसवणूक असल्याचे जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.