Raj Thackeray Live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन राज ठाकरे यांनी कोकण दौरा सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सीमावादाचा प्रश्न अचानक कसा पुढे आला असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका केली. ( Raj Thackeray Press Conference )
सत्ता मिळवण्यासाठी दीर्घ काळ लागतो. मुंबई महापालिका निवडणूक ( BMC Election ) स्वबळावर लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी कुणासाठी काम करत नाही. मी माझ्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतो. असं देखील राज यांनी म्हटलं आहे.
'मुख्यमंत्रीपदावर असे पर्यंत जी व्यक्ती कुणाला भेटत नव्हती. पद गेल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं. हा विषय आरोग्याचा नाही. आता काही त्रास नाही तुम्हाला सगळं व्यवस्थित आहे. सांगण्याचा उद्देश ऐवढा होता की, ज्या लोकांना भेटणं तुम्ही टाळत होत. आता मात्र तुम्हाला वेळ मिळतोय. तेव्हा नाही भेटलात. वर्षावर किती लोकं भेटायला यायचे. ही प्रकृतीची चेष्टा नव्हती, ही परिस्थितीची चेष्ठा होती.'
'कोणत्याही चित्रपटावर आक्षेप असेल तर दिग्दर्शकाला आधी भेटा. लेखकाला विचारा संदर्भ कुठून आणले. सिनेमा न पाहता आक्षेप कसा घेता. महाराष्ट्रात इतके प्रश्न आहेत. पण आपण भलतीकडेच चाललो आहे. मुळ विषय बाजुला राहिलेत.'