MPSC ने उमेदवारी दिलेल्या 111 उमेद्वारांना झटका; नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 पदांची भरती करण्यात आली. त्यापैकी 111 नियुक्त्यांना हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाने ही स्थगिती दिली आहे. 

Updated: Dec 1, 2022, 06:37 PM IST
MPSC ने उमेदवारी दिलेल्या 111 उमेद्वारांना झटका; नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती title=

MPSC Bharti, मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून(Maharashtra Public Service Commission) उमेदवारी दिलेल्या 111 उमेद्वारांना झटका देणारी बातमी आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला हायकोर्टाने (High Court )स्थगिती दिली आहे. यामुळे या 111 उमेदवारांच्या नियुक्ता पुन्हा एकदा रखडल्या आहेत. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 पदांची भरती करण्यात आली. त्यापैकी 111 नियुक्त्यांना हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाने ही स्थगिती दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे याबाबत तातडीची सुनावणी झाली. नियुक्ती पत्र देण्याविरोधात तातडीची याचिका दाखल केलेल्या तीन EWS उमेदवारांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. 

गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार होतं. मात्र, सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता नियुक्तीपत्र देता येणार नाही.
मराठा संघटना आक्रमक

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम होणार आहे पण तो कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मराठा समाजातील उमेदवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजातील उमेदवारांना देखील आजच नियुक्तीपत्र द्यावे अशी त्यांची मागणी आहे अन्यथा हा कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी या उमेदवारांना ताब्यात घेतले आहे.