लष्करप्रमुख भारत सरकार विरोधात न्यायालयात

भारतीय लष्कर प्रमुख व्ही.के. सिंग यांच्या जन्मतारखेवरून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळत चालला आहे. सिंग यांनी सरकारविरुद्ध कोर्टात धाव घेतली. भारत सरकारविरुद्ध कोर्टात धाव घेणार व्ही.के.सिंग हे भारतातले पहिलेच लष्करप्रमुख आहेत.

Updated: Jan 16, 2012, 11:28 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

भारतीय लष्कर प्रमुख व्ही.के. सिंग यांच्या जन्मतारखेवरून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळत चालला आहे.  सिंग  यांनी सरकारविरुद्ध कोर्टात धाव घेतली. भारत सरकारविरुद्ध कोर्टात धाव घेणार व्ही.के.सिंग हे भारतातले पहिलेच  लष्करप्रमुख आहेत. व्ही.के.सिंग यांची सरकारदरबारी असणारी जन्मतारीख 10 मे 1950 आहे. मात्र सिंग यांनी आपली  जन्मतारीख 10 मे 1951 असल्याचा दावा केलाय. युपीएससीच्या अधिकाऱ्यांच्या नजरचुकीमुळं आपली जन्मतारीख बदलली  गेल्याचा लष्करप्रमुख सिंग यांचा दावा आहे. याबाबत सिंग यांनी संरक्षण मंत्रालयाकडं केलेली तक्रार बरखास्त करून 1950  हेच त्यांचं जन्म साल मानण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. त्याला सिंग यांनी आता सुप्रीम कोर्टात आव्हान  दिलं.