www.24taas.com, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सहा महिन्यांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी परदेशी गेल्या होत्या. आता परत एकदा चेकअपसाठी सोनिया गांधी परदेशात गेल्या आहेत. सोनिय गांधींच्या आजाराबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. सोनिया गांधी शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी रुटिन चेकअपसाठी गेल्याचं तसंच त्या चार पाच दिवसात परततील काँग्रेसचे महासचिव जर्नादन द्विवेदींनी सांगितलं.
सोनिया गांधींच्या अनुपस्थितीत पक्षाचा कारभार पाहण्यासाठी टीमची स्थापना केली आहे का अशी विचारणा केली असता ही भेट अल्प काळासाठी असल्याने अशा व्यवस्थेची आवश्यकता नसल्याचं द्विवेदींनी सांगितलं. सोनिया गांधी शस्त्रक्रियेसाठी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेला गेल्या होत्या त्यावेळेस त्यावेळेस त्या एक महिना तिथे राहिल्या होत्या. त्यावेळेस त्यांच्या अनुपस्थितीत राहुल गांधी आणि तीन वरिष्ठ नेत्यांना पक्ष कारभाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती.