www.24taas.com, झी मीडिया, रायबरेली
नरेंद्र मोदींनी आपल्या पतीवर - रॉबर्ट वढेरा यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे प्रियांका गांधी चांगल्याच चवताळल्यात. आज रायबरेलीमध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत जनसभेला संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. एव्हढंच नव्हे तर गुजरातच्या विकास मॉडेलवरही प्रियांका गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत.
भाजप नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या `आरएसव्हीपी`च्या टीकेलाही प्रियांका गांधी यांनी पलटवार केलाय आणि हे कसा काय गुजरातचं विकास मॉडल असू शकतं, असं म्हणत प्रश्नचिन्ही उपस्थित केलंय.
गुजरात सरकारनं शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोल भावानं उद्योगपती आणि व्यावसायिकांना विकल्यात. गुजरातची हजारो एकर जमीन मोदींच्या `मित्रांना` कवडीमोल भावानं विकली. मोदींचं नाव घेतल्याशिवाय त्यांनी समोर बसलेल्या जनतेला विचारलं शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या परवानगीशिवाय घेतल्या गेल्या, त्यावर गुजरात सरकारनं काय केलं.
काँग्रेस `आरएसव्हीपी` मॉ़डेल मानतं, अशी टीका नरेंद्र मोदींनी नुकतीच केली होती. आर म्हणजे राहुल गांधी, एस म्हणजे सोनिया, व्ही म्हणजे वढेरा आणि पी म्हणजे प्रियांका, असा त्यांचा रोख होता. यालाच आज प्रियांका गांधींनी प्रत्यूत्तर दिलंय. टनरेंद्र मोदी शाळेत शिकवत आहेत काय? भाजप नेत्यानं जनतेला इंग्रजी एबीसीडी आणि आरएसव्हीपी सांगू नये, त्याऐेवजी हे सांगावं की ते जनतेसाठी काय करणार आहेत` असं आज प्रियांका गांधी यांनी म्हटलंय.
केवळ खोटं बोलून मोदी सध्या आपली हवा तयार करत आहेत. गुजरात मॉडेल ही तर चक्क फसवणूकच आहे. या मॉडेलमध्ये देशाच्या अन्नदात्यासाठी - शेतकऱ्यांसाठी काहीही नाही. तिथं शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दिशेनं ढकललं जातंय. शेतकरी मोदींच्या सगळ्या गोष्टी हवेतच विरतायत.
यासोबतच, प्रियांका गांधींनी महिलांचाही प्रश्न उचलून धरला. गुजरातमध्ये महिलांनासाठी काय केलं गेलंय, हे कुणापासूनही लपून राहिलेलं नाही, असा जोरदार हल्ला त्यांनी केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.