www.24taas.com,
माशांच्या तेलात आढळणारे ओमेगा ३ हा अम्ल डायलिसिस करणाऱ्या रुग्णांचा बचाव करते. डायलिसिस चालू असणाऱ्या रुग्णांना हृदयाचे ठोके थांबल्यामुळे होणाऱ्या मृत्यूपासून मास्याचे तेल वाचवते.
इंडियाना युनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिकलचे सहाय्यक प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ असलेले ऍलन एन. क्रिडमॅन यांच्या म्हणण्यानुसार संशोधनादरम्यान असं आढळून आलं, की हिमोडायलिसिस सुरु करणाऱ्या रुग्णांच्या रक्तात ओमेगा ३ अम्लाचा उच्च दाबाच्या उपचारादरम्यान पहिल्या टप्यात हृदयचे ठोके थांबल्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करतो.
फिडम्यानच्या म्हणण्या नुसार डायलिसिस चालू असणाऱ्या रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने अचानक होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी हे औषध विकासाच्या दिशेने आमच पहिलं पाऊल आहे. इंडियाना विद्यालयात केल्या जाणाऱ्या संशोधनानुसार होमो डायलिसिसच्या पहील्या टप्प्यातील ४०० रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यातल्या १०० रुग्णांचा मृत्यू झाला, तर ३०० रुग्ण सुरक्षित आहेत.