अहमदाबाद : पैशाचा पाऊस आणि महिला खासदाराचा डान्स. हा प्रकार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यात. चक्क ३० सेकंदांमध्ये उधळले ३ कोटी रुपये उधळलेत.
पैशांचा असा पाऊस यापूर्वी कधी पाहिलाय? ३० सेकंदांमध्ये ३ कोटी रुपये उधळल्याचं पाहिलंय कधी? नाही ना? मग हे बघा. गुजरातमध्ये पैसे कसे उधळले जातायत... आणि या नोटांच्या पावसात बेभान होऊन नाचयतायेत आहेत, भाजपच्या खासदारबाई... होय... शेकडो लोकांसमोर थिरकणाऱ्या या मॅडम कोणी सामान्य नव्हेत... त्या गुजरातमधल्या जामनगरच्या खासदार आहेत.. पूनम मदाम.
पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांचं म्हणणं संसदेत गांभिर्यानं ऐकतात. मात्र, त्यांचा हा प्रताप पाहिला तर मोदीही संतापतील. ४० वर्षांच्या मदाम बेधुंद झाल्यात. संगीताच्या तालावर एक स्थानिक बुजुर्ग नेत्यानंही त्यांच्यासोबत ठुमका धरला आणि शेकडो लोक नोटा उधळतायेत. भाजपच्या या खासदारीणबाईंवर नृत्याची धुंदी चढली आहे.
गमतीचा भाग म्हणजे गुजरातमध्ये वेरावल इथल्या एका भागवत कथा कार्यक्रमात हा प्रकार सुरू होता. अहीर समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला खासदार मदाम यांच्या नृत्याविष्कारानं चार चाँद लावले असणार. या कार्यक्रमात ३ कोटी रुपये उधळले गेल्याचा अंदाज आहे.
तर पंतप्रधानांनी साधी राहणीचा खासदारांना दिलेला सल्ला अद्याप गुजरातला पोहोचला नसावा, असंच यावरून दिसतंय.
पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.