नवी दिल्ली : दारु पिऊन गाडी चालवणा-यांविरोधात आता कडक पावलं उचलण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. त्याचाच भाग म्हणून सुधारीत मोटारवाहन कायद्यातल्या तरतुदी लोकसभेत सादर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अपघात झालेल्या गाडीचा चालक दारु प्याला असल्याचं उघड झाल्यास विम्याचा लाभ त्याला मिळू शकणार नाही.
देशात ड्रंक अँड ड्राईवचं प्रमाण फार मोठं आहे. तर दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे अपघात तसंच मृत्यू होणा-यांचा आकडाही मोठा आहे. सध्याच्या कायद्यानुसार अशा तळीरामांवर कठोर कारवाईची तरतूद नाही. म्हणूनच मद्यपी चालकांवर वचक ठेवण्याकरता, कठोर कायदा करण्याकरता केंद्र सरकार सरसावलं आहे.
- बाईक चालवताना हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपयांचा दंड
- हेल्मेट न वापरल्यास तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द होणार
- बाईकवर बसलेल्या चार वर्षांवरील लहान मुलांसाठी हेल्मेट सक्ती
- गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास ५ हजारांचा दंड
- अल्पवयीन गाडी चालवत असेल तर त्या गाडीची नोंदणी रद्द होणार
- अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्यास पालकाला २५ हजार रुपयांचा दंड, ३ वर्ष शिक्षा
- अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना १० लाख आणि जखमींना ५ लाख रुपयांची मदत
- वाहन परवाने आणि नोंदणी आधार कार्डशी जोडणार