धक्कादायक: सुनेनं जेवण दिलं नाही म्हणून सासऱ्यानं केली हत्या

सुनेनं जेवण दिलं नाही म्हणून रागाच्या भरात सासऱ्यानं तिची हत्या केल्याची घटना दिल्लीत घडलीय. पोलिसांनी ७८ वर्षीय सासऱ्याला अटक केली असून त्यानं आपल्या गुन्ह्याची कबूली दिलीय. 

Updated: Jun 10, 2015, 06:15 PM IST
धक्कादायक: सुनेनं जेवण दिलं नाही म्हणून सासऱ्यानं केली हत्या title=

नवी दिल्ली: सुनेनं जेवण दिलं नाही म्हणून रागाच्या भरात सासऱ्यानं तिची हत्या केल्याची घटना दिल्लीत घडलीय. पोलिसांनी ७८ वर्षीय सासऱ्याला अटक केली असून त्यानं आपल्या गुन्ह्याची कबूली दिलीय. 

दिल्लीतील सुलतानपुरी इथं तेजपाल सिंह, त्याची पत्नी निर्मला, मुलं आणि वडिल हरी सिंह यांच्यासह राहतो. तेजपाल हा न्हावी असून घराजवळच त्याचं दुकान आहे. सोमवारी रात्री तेजपालची पत्नी निर्मला (वय ४५) यांनी सासरे हरी सिंह यांना जेवण दिलं नाही. यामुळे हरी सिंह चांगलेच संतापले. 

रात्री सर्व जण गच्चीवर झोपले असताना हरी सिंह यांनी सून निर्मलावर चाकूनं वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निर्मला यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच निर्मला यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हरी सिंह यांना ताब्यात चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. 

सुनेनं गेल्या चार दिवसांपासून जेवण न दिल्यानं राग आला आणि रागाच्या भरात हे कृत्य घडलं अशी कबुली हरी सिंह यांनी दिली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.