कोलकाता : भाजपमधील पितामह लालकृष्ण अडवाणी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्यावर हवालाचा आरोप केला गेला, मात्र मी त्या वेळी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता, नेत्यांनी मूल्ये आणि नैतिकता टिकवून ठेवली पाहिजे, असा अप्रत्यक्षरीत्या अडवाणी यांनी मोदींवर वार केला आहे.
ललित मोदी प्रकरणाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले, 'सार्वजनिक जीवनात सत्यनिष्ठा कायम राखणे आवश्यक आहे. दरम्यान, त्यांनी सुषमा स्वराज आणि वसुंधराराजे यांच्यावर काही टिप्पणी केली नाही.' यापूर्वी अडवानी यांनी मोदींवर टीका करताना, देशात आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते, असे म्हटले होते. पश्चिम बंगालमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अडवाणींनी हे वक्तव्य केलं आहे.
'एका नेत्यासाठी जनतेचा विश्वास टिकविणे ही सर्वांत मोठी जबाबदारी असते. नैतिकतेसाठी आवश्यक असतो तो राजधर्म, तसेच सार्वजनिक जीवनात सत्यनिष्ठा कायम राखणे आवश्यक असते,' असे हीया मुलाखतीत अडवाणी म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.