नवी दिल्ली : भाजपचे भीष्म पितामह ज्यांना म्हटलं जातं, ते लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांना काय आशीर्वाद दिला असेल?, हा प्रश्न चर्चेत येण्याचं कारणंही तसंच आहे. आज लालकृष्ण अडवाणी यांचा वाढदिवस आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील आज झाली, त्यात भाजपने सपाटून मार खाल्ला आहे. भाजप बिहारमध्ये सत्तासुंदरीची स्वप्न रंगवत असतांना, भाजप बिहारमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
काय आशीर्वाद दिला असेल?
मात्र सकाळी-सकाळी टीव्ही मीडियाने पोस्टल मतमोजणी सुरू असतांना बिहार निवडणुकीचे निकाल देण्यास सुरूवात केली, त्यानंतर मतमोजणीचा पहिला टप्पा सुरू झाला, तेव्हा भाजप आघाडीवर असल्याचं दिसत होतं, याचवेळी मोदी यांनी मिठाई आणि फुलांचा गुच्छ घेऊन लालकृष्ण अडवाणी यांचं घर गाठलं.
मोदींनी अडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र या दोन्ही नेत्यांची नजरानजर झालेली स्पष्ट दिसत नव्हती. या भेटीत दोन्ही नेत्यांनी नजरा नजर टाळली का?, मोदींना अडवाणींनी कोणता आशीर्वाद दिला असेल, हा देखील प्रश्न आहे.
यानंतर मोदी पंतप्रधान निवास परतले असतील किंवा नसतील, त्या आधीच भाजपला बिहारमध्ये जेडीयू आणि राजपाने मागे टाकलं होतं, सत्तेचा परिपाठ बदलणारा हा निकाल होता. आश्चर्यचकीत करणारे आकडे समोर येत होते, अखेर भाजपचा विधानसभेतला आकडा बिहारमध्ये तिसऱ्या नंबरवर जाऊन स्थिरावला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.