नवी दिल्ली: रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढा अशी सूचना आणि रेल्वे या सर्व साखळ्या काढणार असल्याची बातमी होती. मात्र रेल्वे थांबविण्यासाठी साखळी काढण्याचा असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलंय.
त्यामुळं आता 'रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढा' ही सूचना वाचता येणारच आहे.
आपत्कालीन स्थितीत ट्रेन थांबवण्यासाठी असलेली डब्यातली साखळी रेल्वेतर्फे काढून टाकण्यात येणार असल्याचं वृत्त होतं, मात्र असं करण्याचा कुठलाही विचार नसल्याचं सांगत हे वृत्त रेल्वेतर्फे धुडकावून लावण्यात आलं आहे.
दोनच दिवसांपूर्वी रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी रेल्वेतून चेन प्रणाली हटवण्याची योजना असल्याचा दावा केला होता. चेनचा दुरुपयोग होण्याच्या घटना वाढल्यामुळं रेल्वेचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र ही प्रणाली काढून टाकण्याचा कुठलाही विचार नसल्याचं रेल्वे प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.