नवी दिल्ली : तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... विनाअनुदानित घरगुतील गॅस सिलेंडरच्या दरांत कपात करण्यात आलीय.
एलपीजी सिलेंडर दरात 25.25 रुपयांची कपात करण्यात आलीय. त्यामुळे आता, विनाअनुदानिक घरगुती गॅस सिलेंडरात 585 रुपयांत उपलब्ध होईल. नवीन दर उद्यापासून लागू होणार आहेत.
दुसरीकडे एटीफ (विमान इंधन)च्या दरांतही 11.7 टक्क्यांची जबरदस्त कपात करण्यात आलीय.
अधिक वाचा - पेट्रोल २ रूपये, डिझेल ५० पैशांनी स्वस्त
यापूर्ऴी, सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कपात करण्यात आली होती. पेट्रोल 2 रुपये प्रति लिटर तर डिझेल 50 पैसे प्रति लिटर स्वस्त झालंय.
अधिक वाचा - सोन्याच्या किमतीत घसरण, आता २६,७०० रुपये प्रति १० ग्राम
सूत्रांच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती पडल्यानं पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत कपात होत आहे. तेल किंमतींमध्ये कपातीच्या दरम्यान इंधन दरात या महिन्यात ही तिसऱ्यांचा कपात होतेय, हे विशेष.
अधिक वाचा - गुड न्यूज: आता गॅस कनेक्शन मिळणार ऑनलाइन
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.