नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अर्थसंकल्पाचे स्वागत केलेय. या अर्थसंकल्पात देशातील सर्वच घटकाचा विचार करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केलेल्या बजेटमुळे रेल्वेचा विस्तार होणार असून, विकासही साधला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली.
सदानंद गौडा यांनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात पारदर्शकता दिसत आहे. या बजेटमुळे एकात्मतेला बळ मिळाले आहे. या अर्थसंकल्पात तंत्रज्ञानाचा परिणामकारकपणे वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. रेल्वेचा पाया मजबूत करण्यावर अर्थसंकल्पात विचार केला असल्याचेही मोदी म्हणालेत.
भारतीय रेल्वे ही देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या रेल्वेमध्ये तंत्रज्ञानाता वापर गौडा यांनी केलाय. त्यामुळे रेल्वेमध्ये सुधारणा दिसून येतील. रेल्वे केवळ प्रवासी ने-आण करण्याचे साधन नसून, ते देशाच्या विकासाचे इंजिन आहे, असे मोदी म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.