नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारी हे उद्योजक व्यापाऱ्यांचं आहे. हे सुटा-बुटातल्या लोकांसाठीचं सरकार आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत बोलतांना केली आहे.
या देशातील जवळ-जवळ ६० ते ६७ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे, तरी देखिल शेतकऱ्यांविरोधात भूमि-अधिग्रहणाचा निर्णय घेतला जात आहे. हे शेतकऱ्यांना दुखावण्यासारखं आहे. सरकार आज शेतकऱ्यांना दुखावेल, शेतकरी उद्या सरकारला नक्की दुखावतील. हे भाजप सरकारसाठी मारक तर आमच्यासाठी फायदेशीर असल्याचं राहुल गांधी यांनी बोलतांना म्हटलं आहे.
सरकार हे कशासाठी करतंय याचं उत्तर मला मिळालंय, सरकारचे कॉर्पोरेट मित्र यासाठी जबाबदार आहेत, जमिनीच्या किंमती वाढत असतांना उद्योजकांना स्वस्तात जमीन हवी आहे, म्हणून हे प्रयत्न सुरू असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
भाजप सरकारने शेतीवरील निधी का कमी केला?, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.