लखनऊ: उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव सरकार पुन्हा एकदा आपल्या मंत्र्यांच्या वायफळ बडबडीमुळं अडचणीत सापडलं आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेले तोताराम यादव यांनी बलात्कार हा मुलगा आणि मुलीच्या आपापसातील समजुतीनं होत असल्याचा नवा जावईशोध लावला आहे.
मैनपुरी इथल्या तुरूंगाची पाहणी केल्यानंतर पत्रकारानं तोताराम यांना राज्यातील वाढल्या बलात्कारांच्या घटनांबाबत प्रश्न केला असता, तोताराम यांनी काय आहे बलात्कार? असा प्रतिसवाल करत, बलात्कारासारखा कोणताही प्रकार नसतो अशी मुक्ताफळं उधळली. त्यांच्या या बरळण्यामुळं सर्व स्तरांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बलात्काराच्या घटना घडल्यानंतर राज्यातील नागरिक सरकारलाच दोषी ठरवतात. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीका सतत होत असते. जर मुलगा-मुलगी यांच्या सहमतीनंच शरीर संबंध ठेऊन नंतर त्याला बलात्काराचं स्वरूप दिलं जात असेल तर यात सरकारचा काय दोष आहे, असा सवालही त्यांनी केला.
(with agency inputs)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.