सेंट पीटर्सबर्ग : रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आयुष मंत्रालया'ची चांगलीच शाळा घेतलीय. सोबतच, त्यांनी नरेंद्र मोदीही 'योग' करतात का? असा प्रश्नही विचारलाय.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाच्या प्रचारासाठी एक वेगळं मंत्रालय सुरू केलंय ही गोष्ट जेव्हा पत्रकारांनी पुतिन यांना सांगितली तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न होता की, 'मोदी स्वत: योग करतात का?'... जो व्यक्ती जगभर योगाचा प्रसार - प्रचार करतोय तो स्वत: योग करत असेल, यावर पुतिन यांनी शंका उपस्थित केलीय.
त्यानंतर त्यांनी वेगळ्या मंत्रालयावर आश्चर्य व्यक्त करत, '...पण प्रत्येकानंच योग का करावा?' असाही प्रश्न विचारला.
भारतीय मोदी सरकारनं आयुर्वेद, योग, यूनानी, सिद्ध तसंच होमियोपॅथी संबंधी प्रकरणांसाठी एक वेगळं मंत्रालयच नोव्हेंबर २०१४ मध्ये गठित केलंय... हेच आयुष मंत्रालय...
एका प्रश्नाचं उत्तर देताना 'मोदी एक चांगले व्यक्ती आहेत आणि व्यक्तिगत स्वरुपात ते माझे मित्रही आहेत' असंही पुतिन यांनी म्हटलंय.
मोदी आणि पुतिन यांच्याकडे जगातील कडक नेत्याच्या रुपात पाहिलं जातं... या आयएएनएसच्या प्रश्नावर उत्तर देताना पुतिन यांनी 'मी कठोर नाही, पण नेहमीच चांगले संबंध बनवण्यावर माझा भर असतो. पण, मोदींचा स्वभाव मात्र कडक असतो' असंही पुतिन म्हणतायत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.