काठमांडू: नेपाळच्या संसदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरु झालंय. आपल्या भाषणात मोदींनी नेपाळ आणि भारताचं नातं हे हिमालय-गंगेसारखं जुनं असल्याचं म्हटलंय. नेपाळच्या प्राथमिक विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडून नेपाळला १०,००० कोटी नेपाळी रूपयांची मदत जाहीर केलीय. भारतानं नेपाळला याआधी केलेल्या मदती व्यतिरिक्त हा निधी असेल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. भारताने दिलेली ही मदत विविध इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्ससाठी वापरला जाणार आहे. नरेंद्र मोदींनी यावेळी नेपाळसाठी नवी 'हीट' ही संज्ञा वापरली. हीटमधील एच म्हणजे हायवे, आय म्हणजे आय वेज, आणि टी म्हणजे ट्रान्सवेज असं मोदी म्हणाले.
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे-
04:54PM - मोदींनी दिला नेपाळ HIT फॉर्म्यूला. एच - हाय वे (महामार्ग), आय - इन्फोर्मेशन वे, टी - ट्रान्समिशन.
04:51PM - नेपाळमध्ये पर्यटन वाढवण्याची गरज. त्यामुळे सर्वांचाच विकास होईल - मोदी
04:50PM - नेपाळच्या विद्यार्थ्यांसाठी भारतात शिक्षणाचे द्वार उघडू. त्यांना स्कॉलरशिप देऊ - मोदी
04:49PM - फक्त भारताला वीज विकूनही नेपाळ समृद्ध होऊ शकतो. भारत नेपाळच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करायला तयार - मोदी
04:47PM - भारताला नेपाळकडून फुकट वीज नको. आम्ही वीज विकत घ्यायला तयार. यामुळे तुमच पाणीही जाणार नाही - मोदी
04:46PM- तुमच दुःख तेच आमच दुःख - मोदी
04:45PM - नेपाळ आणि भारत वेगळे होऊ शकत नाही. आपल नात अतूट. नेपाळच्या विकासासाठी भारत कटीबद्ध - मोदी
04:43PM - संविधान हा सर्वजनसुखाय सर्वजनहिताय असायला पाहिजे - मोदी
04:41PM - भारताला नेपाळच्या कामात ढवळाढवळ करायची नाही. नेपाळ सार्वभौम राष्ट्र आहे. त्यांच्या कार्यात त्यांना मदत करणे हेच आमचे उद्दीष्ट - मोदी
04:35PM - नेपाळने शस्त्रांऐवजी शास्त्राद्वारे समस्येवर तोंडगा काढला. यामुळे जगात हिंसेवर विश्वास ठेवणा-या देशांना एक नवीन संदेश जाईल - मोद
04:31PM - नेपाळ ही वीरांची भूमी आहे - मोदी
04:28PM - नेपाळचे जवान भारतासाठी शहीद झाले. भारतासाठी बलिदान देणा-या या जवानांमुळेच भारताला प्रत्येक युद्धात विजय मिळाला - मोदी
04:27PM - भारत - नेपाळचे संबंध गंगा आणि हिमालयऐवढेच जुने. दोन्ही देशांची संस्कृती एकच. दोन्ही देश ह्रदयाने जोडलेले आहेत - मोदी.
04:24PM - नेपाळमध्ये आल्याचे मला अभिमान. नेपाळमधील संसदेत संबोधित करायला मिळणे हे माझे भाग्यच - नरेंद्र मोदी
04:22PM - नेपाळच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु. नेपाळी भाषेने केली भाषणाची सुरुवात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.