मुंबई : सध्या सोशल मीडियावर रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर म्हणजे आर्ची आणि परशाचे एकही ओरिजनल अकाउंट नाही सर्व फेक अकाउंट आहेत, या बाबत माहिती सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती सांगितले.
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचे खरे फेसबूक अकाउंट फेक फेसबूक पेजवाल्यांनी ब्लॉक केले.
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या खऱ्या फेसबूक अकाउंटमध्ये फक्त नागराज मंजुळे हेच म्युचल फ्रेंड होते. पण आता फेक अकाउंटवाल्यांनी हेच अकाउंट बंद केले आहे.
रिंकू राजगुरूच्या नावाने अनेक फेसबूक पेज तयार झाले आहेत. त्यातील एका फेक अकाउंटवर तिचा नंबर पोस्ट करण्यात आला तो व्हायरल झाला. त्यामुळे सुभाष देसाईंना त्रास झाला.