'धकधक गर्ल'ची मॅगीने धडधड वाढवली !

माधुरी दीक्षितला 'मॅगी' नूडल्सची जाहिरात केल्याबाबत हरिद्वार अन्न सुरक्षा विभागानं नोटीस पाठवली आहे. माधुरीवर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

Updated: May 29, 2015, 01:36 PM IST
'धकधक गर्ल'ची मॅगीने धडधड वाढवली ! title=

मुंबई: माधुरी दीक्षितला 'मॅगी' नूडल्सची जाहिरात केल्याबाबत हरिद्वार अन्न सुरक्षा विभागानं नोटीस पाठवली आहे. माधुरीवर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

माधुरीला पंधरा दिवसात या नोटीसला उत्तर देण्यास अन्न सुरक्षा विभागानं सांगण्यात आलं आहे. उत्तर न दिल्यास एडीएम कोर्टात अन्न सुरक्षा अधिनियमार्तंगत तक्रार दाखल करण्यात येणार आहे. ही नोटीस अन्न सुरक्षा अधिनियम 24 आणि 53 अंतर्गत पाठवण्यात आली आहे. 

मॅगीमध्ये लेड आणि एमएसजीसारखे घातक तत्व आढळले आहेत. नेस्ले इंडिया कंपनीने मॅगीचे अनेक पाकिटं परत मागवली आहेत. इंडियन फूड ड्रग अॅंड अॅडमिनिस्ट्रेशनच्या फूड निरिक्षकांनी लखनऊतून मॅगीची पाकिटं जप्त केली. ज्यामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट आणि लेटसारखे घातक तत्व आढळले होते. मॅगीने याबाबत आपली बाजू मांडली आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.