मुंबई : सलमान शिवाय बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणं शक्य झालं नसतं, अशी कबुली कतरिना कैफनं दिली आहे. सनमान माझा बॉलिवूडमधील गॉडफादर आहे, असंही कतरिनानं सांगितलं.
एकीकडे रणबीरसोबत तिच्या प्रेमाचे किस्से रंगत असतांना अशी सलमानची भरभरून स्तूती करून तिनं सलमानविषयीचा आदर व्यक्त केला आहे. सलमानशिवाय बॉलिवूडमध्ये करिअर शक्य नव्हतं असंही ती म्हणाली.
सलमान माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग असून तो माझा खूप चांगला मित्र आहे. जगात इतकी चांगली माणसं फार कमी आहेत. सलमानच्या कुटुंबियांसोबत माझं अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे आणि ते कायम तसंच राहील असं बोलत तिनं तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या.