मुंबई : दिलवाले आणि बाजीराव यांच्यातील जागतिक स्तरावर लढत कायम असून शाहरूखच्या 'दिलवाले'ने बाजी मारली आहे. देशांतर्गत थिएटरमध्ये धम्माल कामगिरी करणारा रणबीर, दीपिका आणि प्रियंका यांच्या 'बाजीराव' मागे पडला आहे.
शाहरूख खानच्या दिलवालेने आतापर्यंत जागतिक पातळीवर ३३८.७५ कोटी रूपये कमिवले आहे. १८ डिसेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने देशात १८७ कोटी तर देशाबाहेर १५१.५० कोटी कमावले आहेत, असे रेड चिली एन्टरटेन्मेंट यांनी जाहीर केले आहे.
तर 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटाने जगभरात एकूण ३०१ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे तो एकूण ३७ कोटी ७५ लाखांनी मागे पडला आहे.
'दिलवाले'ने मलेशिया, कुवेत, इंडोनेशियात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे बाजीरावला फटका बसला आहे.