मुंबई : बिहारी बाबू नावानं प्रसिद्ध असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा हीनं मध्यरात्री मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलनं प्रवास केला आहे.
सोनाक्षीनं ट्विटरवर लोकलच्या प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. "मी कॉलेजमध्ये असताना लोकलमधून प्रवास केला होता पण तेव्हा लोकल खचाखच भरलेली असायची. आता जवळजवळ संपूर्ण लोकल रिकामी होती. माझ्या 'अकिरा' या नव्या चित्रपटासाठी मी मध्यरात्री मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलनं प्रवास केला आहे", असं सोनाक्षीनं ट्विटरवर आपल्या प्रवासाचं वर्णन केलंय.
सोनाक्षीचा नवीव चित्रपट 'अकिरा'साठी खास तिनं मुंबई लोकलनं प्रवास केला आहे. अकिरा हा तमिळ चित्रपट 'मौनागुरू' (२०११) याचा हिंदी रिमेक आहे. ए. आर. मुरूगदास या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. यात सोनाक्षी सिन्हा बरोबर कोंकणा सेन, अनुराग कश्यप तसंच सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.