अक्षय कुमारचा हा व्हिडिओ करेल तुम्हाला थक्क

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला. त्यात तो टॉयलेटविषयी आपल्या चाहत्यांशी संवाद साधतोय.

Intern Intern | Updated: Mar 25, 2017, 07:05 PM IST
अक्षय कुमारचा हा व्हिडिओ करेल तुम्हाला थक्क title=

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला. त्यात तो टॉयलेटविषयी आपल्या चाहत्यांशी संवाद साधतोय.

हे टॉयलेट म्हणजे त्याचा चित्रपट नाही मित्रांनो तर टॉयलेट म्हणजे स्वच्छतागृह. हो, तेच स्वच्छतागृह जे नसल्यामुळे देशातील लाखो महिलांना, मुलींना घराबाहेर उघड्यावर बसावं लागतं. आणि याच विषयावर तो व्हिडिओत कळकळीने बोलतोय.

आपल्या आगामी चित्रपटाच्या संशोधन आणि चित्रीकरणावेळी समोर आलेल्या गोष्टी तो आपल्याशी शेअर करतोय. हा व्हिडिओ नक्की बघा, कदाचित तुम्हालाही तुमची 'सोच आणि शौच' बदलावासा वाटेल.