नागपूर : अवघ्या दहा वर्षांच्या लहानग्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.
वेदांत राऊत असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव असून तो चौथ्या वर्गात शिकत होता. नागपूरच्या जयताळा परिसरातील महाजन ले आउट इथे वेदांत आपल्या पालकांसोबत राहत होता.
वेदांतचं गेल्या एक महिन्यापासून पोट दुखत असल्याने तो शाळेत जात नव्हता. वेदांत बुधवारी शाळेत गेला नाही. घरी दुपारी २ वाजेपर्यंत त्याने फटाके फोडले... त्याची आई कामानिमित्त बँकेत गेल्यावर घरी एकटाच असलेल्या वेदांतने घराची खिडकी - दारे बंद करून सिलिंग फॅनला दुपट्ट्याने गळफास घेतला.
आई घरी परत आल्यावर शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडले व वेदांतला खाली उतरवून खासगी दवाखान्यात नेले मात्र डॉक्टरांनी वेदांतला तपासून मृत घोषित केलं.