'बनावट कोर्ट ऑर्डर' बनवून मिळवला जामीन!

बनावट कोर्ट ऑर्डर तयार करून खुनाच्या गुन्ह्यातल्या आरोपींनी जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. तुषार निम्हण आणि चेतन निम्हण अशी या दोन ठकसेन भावांची नावं आहेत. 

Updated: Dec 11, 2014, 11:55 AM IST
'बनावट कोर्ट ऑर्डर' बनवून मिळवला जामीन! title=

पुणे : बनावट कोर्ट ऑर्डर तयार करून खुनाच्या गुन्ह्यातल्या आरोपींनी जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. तुषार निम्हण आणि चेतन निम्हण अशी या दोन ठकसेन भावांची नावं आहेत. 

गेल्या वर्षी १२ एप्रिलला प्रतिक निम्हण हत्येप्रकरणी १० जणांना अटक झाली होती. यातल्या ८ जणांना जामीन मिळाला मात्र तुषार आणि चेतनचा जामीन सत्र न्यायालय आणि हायकोर्टानं फेटाळला होता.
मात्र, या दोघांनी गेल्या महिन्यात जामीन मिळाल्याचा २० तारखेचा कोर्टाचा आदेश दाखवून २२ तारखेला आपली मुक्तता करून घेतली होती आणि राजरोसपणे वावरताना दिसले.

त्यानंतर फिर्याददार कीर्ती काळे यांनी माहिती काढल्यावर कोर्ट ऑर्डर बनावट असल्याचं समोर आलं. 

विशेष म्हणजे, त्यांना जामीनावर सोडणाऱ्या कारागृह प्रशासनालाही या फसवणुकीची कल्पना आली नाही. या आरोपींचे वडील तानाजी निम्हण पुण्याले माजी नगरसेवक आहेत. 

 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.