महाराष्ट्रातल्या रखडलेल्या २६ सिंचन प्रकल्पांना निधी

महाराष्ट्रातल्या रखडलेल्या २६ सिंचन प्रकल्पांना १६ हजार कोटी रूपयांचा निधी मिळणार

Updated: Sep 7, 2016, 11:25 AM IST
महाराष्ट्रातल्या रखडलेल्या २६ सिंचन प्रकल्पांना निधी title=

मुंबई : महाराष्ट्रातल्या रखडलेल्या २६ सिंचन प्रकल्पांना १६ हजार कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारचा नाबार्डसोबत करार झालाय. नाबार्डकडून 12 हजार 773 कोटी तर केंद्र सरकार 3 हजार 830 कोटी रुपये देण्यासंदर्भातला हा करार झाला आहे. या आर्थिक मदतीमुळं राज्यातल्या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची कामं युद्धपातळीवर सुरू होणार आहेत. 

देशभरातल्या तब्बल 99 मोठे आणि मध्यम स्वरूपाचे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा केंद्रानं धोरणात्मक निर्णय घेतलाय. त्यात महाराष्ट्रातल्या 26 प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापूर्वीच निर्णय झाला होता. त्यानुसार ही पावलं उचलण्यात आली आहेत.