रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपकेंद्रात ‘हॉस्पिटॅलिटी’ (आदरातिथ्य) अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे.
कोकणमधील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकेच्या हवाई विद्यापीठाशी या अत्याधुनिक अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
कोकणात पर्यटनासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. मात्र अपुर्या सोयीसुविधा आणि पर्यटकांना योग्य माहिती मिळत नसल्यामुळे पर्यटनाचा विकास हव्या त्या प्रमाणात होत नाही. याची दखल घेत खास अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनच कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी विद्यापीठाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत.
रत्नागिरी उपकेंद्रात अद्ययावत सुविधा पुरवण्यात येणार आहेत. त्यासाठी कोकणच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या उपकेंद्राची पाहणी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र, बीसीयूडी डायरेक्टर डॉ. राजपाल हांडे, युवा सेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, शशिकांत झोरे उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.