नाशिक : शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून आडत घेतली जावी या निर्णयाला नाशकातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. आडत्याच्या कात्रीतून बळीराजाची सुटका करण्याचा प्रयत्न पणन संचालक सुभाष माने यांनी केला आहे, हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे, या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. मात्र या निर्णयावर नाशकातले व्यापारी संतापले आहेत.
व्यापाऱ्यांनी उद्यापासून लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे उद्या कांद्याचा लिलाव होणार किंवा नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली आडत पद्धत पुन्हा सुरु करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. यामुळे सरकार नेमका काय निर्णय घेत हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.