ठाणे : मुंबईच्या डी एन नगर पोलीस ठाण्यात मॉडेल पूजा मिश्रा आणि श्रुती गुप्ता नावाच्या मॉडेलने हैदोस घातला.
विनयभंगाची तक्रार देण्यास आलेल्या या दोन्ही मॉडलचा पोलीस स्टेशनला येताच सूर बदलला आणि त्यांनी पोलिसांवर आरोप करण्यास केली. या मॉडेल्सनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही धक्का-बुक्कीदेखील करण्यात आली.
रात्री एटीएममधून पैसे काढत असताना काही अज्ञात तरुणांनी त्यांची छेड़ काढली होती. त्यानंतर या दोघींनी पोलिसांना फोन केला. मात्र, तोपर्यंत आरोपी फरार झाले होते.
पोलिसांनी मॉडेलला पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यास सांगितले. मॉडल जश्या पोलिस ठाण्यात पोचल्या पोलीस आरोपींना घेऊन पोलीस ठाण्यात आले. मात्र, पकडलेल्या आरोपींवरून पोलीस आणि मॉडल्समध्येच जुंपली. या मॉडेल्सनं शिवीगाळ करत महिला पोलिसांना मारहाणदेखील केली... या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.