नागपूर : नागपुरात उष्णतेचा कहर सुरू आहे. नागपुरात पा-याने ४६अंशांचा टप्पा ओलांडलाय. बुधवारी नागपूरत ४६.१० अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. नागपुरात २४ तासात उष्माघातामुळे २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती आहे.
सक्करदरा पुलाखाली ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडलाय तर नंदनवन सिमेंट रोडवर गणनायक सभागृहाजवळ ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचंही समोर आलंय.. नागपूरसह संपूर्ण विदर्भात उकाड्यानं कहर केलाय. उष्णतेच्या लाटेने नागपूरकर हैराण झालेत.
देशात चौदाशे बारा लोकांचा मृत्यू
देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये बांधकाम मजूर, वृद्ध आणि बेघर यांची सर्वाधिक संख्या आहे.
उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका आंध्रप्रदेशला बसला आहे. उष्णतेनं राज्यात ८५२ जणांचा बळी घेतला असून २४ तासात ३०१ जणांना उष्णतेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. केवळ दक्षिण भारतातच उष्णतेने कहर केलाय असं नाही तर उत्तर भारतातही उष्णतेची लाट आलीय. मध्य प्रदेशातही अंग भाजून काढणारं ऊन जनता अनुभवतेय. विशेष म्हणजे जम्मु मध्येही उष्णतेची लाट आलीय.
केवळ आंध्र प्रदेशात आतापर्यंत एक हजार २० तर तेलंगणामध्ये ३४० लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. तेलंगणात ४८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीये. उत्तर भारतही वाढत्या तापमानानं हैराण झालाय.
उत्तर प्रदेशही चांगलाच तापलाय. अलाहाबाद सारख्या शहरात ४७ अंश तापमान आहे. तर आग्रामध्ये ४६ अंश तापमान आहे. काही ठिकाणी तर कडक उन्हामुळे रस्तावरील डांबर वितळल्याचं चित्र पहायलं मिळतंय. उष्माघाताचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा पुरेश नसल्याचं दिसून येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.