पाहा कोणाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही

तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल, तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही. पुरवठा विभाग या संदर्भात पुढच्या आठवड्यात एक सर्वेक्षण करत आहे. त्यात पात्र अपात्र लाभार्थींची नव्यानं यादी तयार करण्यात येत आहे. 

Updated: Oct 15, 2015, 09:27 PM IST
पाहा कोणाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक: तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल, तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आता केशरी शिधापत्रिकेचा लाभ मिळणार नाही. पुरवठा विभाग या संदर्भात पुढच्या आठवड्यात एक सर्वेक्षण करत आहे. त्यात पात्र अपात्र लाभार्थींची नव्यानं यादी तयार करण्यात येत आहे. 

आणखी वाचा - पालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!

सरकार एकीकडे अन्न सुरक्षा कायदा लागू करून कोणीच वंचित राहणार नाही याची खबरदारी घेत आहे. तर दुसरीकडे त्याच योजनेअंतर्गत कमी उत्पन्न गटाच्या सीमारेषेवर असणाऱ्यांनाही योजनेपासून दूर ठेवत आहे. ज्यांचं उत्पन्न 59 हजार म्हणजे महिन्याला 5 हजार रूपये आहे, जे नागरिक व्यवसाय करतायेत, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे किंवा ज्यांच्या डोक्यावर कमीतकमी वन बीएचकेचं घर आहे असे सर्व केशरी शिधापत्रिकाधारक अपात्र ठरणार आहेत. 

आणखी वाचा - घर घेताय, थोडे थांबा! नवी मुंबईत ५ लाख स्वस्त घरे

धान्य वितरण व्यवस्थेत मुळात अनेक दोष आहेत, हक्काचे लाभार्थी अजूनही वंचित राहात आहेत. त्यामुळं ही वितरण व्यवस्था आधी सुरळीत कऱण्याची मागणी होत आहे. सर्वेक्षण झालं तरी खऱ्या लाभार्थ्यांना सर्व लाभ मिळणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.