नवी मुंबई : पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणे याला कामोठे पोलिसांनी अटक केली. पुणे गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींनी अटक झालीये.
गजानन मारणे आणि रुपेश मारणे असं या आरोपींचं नाव असून कामोठेतील व्यंकट हॉटेलजवळ या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन कोयतेही हस्तगत करण्यात आलेत.
हे दोघेही राजस्थानहून पुण्याला चालले होते दरम्यान त्यांना कामोठे येथे अटक करण्यात आली. दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात अमोल बधे याची या दोघांनी हत्या केली होती.
पुण्यामध्ये गेल्या काही दिवसात टोळी युद्धानं चांगलीच दहशत पसरवलीय. पिंपरी-चिंचवडमध्ये कुख्यात गुंड आणि स्वयंघोषित कामगार नेता प्रकाश चव्हाण याच्या हत्येनं खळबळ उडालीय.
दरम्यान, बनावट न्यायालयीन आदेशाच्या आधारे खुनातील आरोपींची जामिनावर मुक्तता होण्याचा प्रकार बुधवारी पुण्यात घडलाय. तुषार निम्हण आणि चेतन निम्हण या दोन ठकसेन भावांना प्रतिक निम्हण हत्येप्रकरणी जामीन सत्र न्यायालय आणि हायकोर्टानं फेटाळला होता.
मात्र या दोघांना गेल्या महिन्यात जामीन मिळाल्याचा २० तारखेचा कोर्टाचा आदेश दाखवून २२ला आपली मुक्तता करून घेतली होती आणि राजरोसपणे वावरताना दिसले. आता हा प्रकार उघड झाल्यावर या दोघांना पुन्हा जेरबंद करून अटक करण्य़ात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.