कोल्हापूर : महायुतीतील जागावाटपाची धुसफूस टोकाला गेली आहे. १२ जागा दिल्या नाहीत तर महायुतीच्या बाहेर पडू असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिलाय.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या भ्रष्टाचारी नेत्यांना प्रवेश देण्याचा धडाका भाजप-शिवसेनेत सुरू आहे. मात्र अशा नेत्यांचा प्रचार आम्ही करणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका खोत यांनी मांडली आहे.
छोटे घटक पक्ष आवास्तव जागा मागत असल्याचा प्रचार करुन भाजप-सनेनं त्यांच्या बदनामीचा कटही केल्याचा आरोप खोत यांनी केलाय. यामुळं आता जागावाटपाचा संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचं दिसतंय.
दरम्यान, महायुतीतल्या जागावाटपाचा निर्णय येत्या तीन चार दिवसांत घेणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय. जागावाटपासंदर्भात शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत ठाकरेंनी मेटेंना तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.