उद्धव परतले घरी, राज मात्र नाही आले दारी

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 'मातोश्री' निवासस्थानी ते परतले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

Updated: Jul 23, 2012, 05:23 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 'मातोश्री' निवासस्थानी ते परतले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

 

मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. तत्पूर्वी याच हॉस्पिटलमध्ये त्यांची अँजिओग्राफी झाली होती. त्यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना अँजिओप्लास्टी करुन घेण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, गेल्या चार दिवसात मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या अनेक नेत्यांनी तसेच उद्योगपती, कलाकारांनी उद्धव यांची भेट घेऊन प्रकृतिची विचारपूस केली.

 

अँजिओग्राफी झाली त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: लीलावतीत आले होते. तेथून स्वता:च्या कारमधून त्यांनी उद्धव यांना मातोश्रीवर पोहचवलं होतं. आज मात्र राज ठाकरे उपस्थित नव्हते.