मुंबई : ऐतिहासिक छत्रपती शिवाजी टर्मनिसवर ५ नंबरच्या प्लॅटफॉर्मवरच्या बफर एन्डला काल रात्री दोनच्या सुमारास लोकल धडकल्यानं अपघात झाला. या अपघातात लोकल आणि प्लॅटफॉर्मचं मोठं नुकसान झालं. दरम्यान, पुन्हा वाहतूक सुरळीत सुरु झालेय.
आज सकाळी सहाच्या सुमारास लोकलचे डबे हटवण्यात आले. पण वाहतूक सकाळी साडे आठपर्यंत ५ नंबरच्या प्लॅटफॉर्मवरची वाहतूक ठप्प होती. त्यामुळे अनेक गाड्या उशिरानं धावत होत्या. अपघाताच्यावेळी फलाटावर प्रवाशांची गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. मात्र, फलाटाचे व बफरचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.. मध्यरेल्वेच्या महाव्यवस्थापक स्तरिय अधिकाऱ्या मार्फत चौकशी होणार आहे. दरम्यान आता वाहतूक सुरळीत झाल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी म्हटलंय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.