मुंबई : अमेरिकेतील नामांकीत आणि प्रतिष्ठीत हॉवर्ड विद्यापीठ त्यांचं आंतरराष्ट्रीय कार्यालय मुंबईत सुरू करणार आहे.
'पीटीआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. हॉवर्ड विद्यापीठा अंतर्गत मुंबईत सार्वजनिक आरोग्य शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
भारतात हॉवर्ड विद्यापीठाने शैक्षणिक संस्था सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबई व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन आणि चीनच्या बीजिंगमध्येही हे आंतरराष्ट्रीय कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे.
भारत सरकार आता हॉवर्डला परवानगी देणार का? याचीच उत्सुकता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.